ACTREC Recruitment 2023 : 'टाटा मेमोरियल सेंटर'मध्ये 'ITI' धारकांसाठी नोकरीची संधी

22 Aug 2023 17:36:03
ACTREC Tata Memorial Centre Recruitment 2023

मुंबई :
टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC) मध्ये 'आयटीआय' धारकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवार निवडले जाणार आहेत. लिफ्ट तंत्रज्ञ (Lift Technician) पदाच्या मुलाखतीसाठी उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असावे. तसेच, मान्यताप्राप्त संस्था / NCVT प्रमाणपत्र आणि प्रतिष्ठित लिफ्ट उत्पादकासह किमान पाच वर्षांचा नोकरीचा अनुभव असावा.

दरम्यान, टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत लिफ्ट तंत्रज्ञ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आयआयटी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच,इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २५ ऑगस्ट २०२३ रोजी नियोजित स्थळी सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : तिसर्‍या मजल्यावर, खानोलकर शोधिका, टीएमसी-एसीटीआरईसी (TMC-ACTREC), सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई : ४१० २१०, मुलाखतीची कधी : २५ ऑगस्ट २०२३ आणि निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीच्या माध्यमातून तर निवड झालेल्या उमेदवारास मिळणारे वेतन दरमहा ३०,००० ते ४०,००० रुपये असणार आहे.



Powered By Sangraha 9.0