कियारा अडवाणीने पालोमाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी दिल्या शुभेच्छा

21 Aug 2023 17:42:07
Kiara Advani Give Best Wishes To Paloma For Her First Movie

मुंबई :
“दोनों” चित्रपटाच्या टीझरनंतर निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा पहिला टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांनी हा ट्रॅक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात ‘मैने प्यार किया’ मधून केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तेव्हापासून सलमान चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

राजश्री आणि जिओ स्टुडिओ निर्मित आणि अवनीश बडजात्या दिग्दर्शित दोनों संपूर्ण इंटरनेटवर मने जिंकत आहे. केवळ टीझरच नाही तर नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या शीर्षक गीतालाही सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळात आहे. या गाण्याचे चाहत्यांनी कौतुक केले, पण बॉलीवूडमधील कलाकारांनीही या गाण्याला पसंती दिली आहे. (Hum Dono Song Out)

सलमान खान आणि सनी देओलनंतर कियारा अडवाणीने सोशल मीडियावर मैत्रिण पालोमाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर तिने टीमला देखील शुभेच्छा दिल्या आहेत.




Powered By Sangraha 9.0