काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीतून बाळासाहेबांना डच्चू का दिला?

21 Aug 2023 13:22:39

Congress Working Committee 
 
 
मुंबई : मुंबई : राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली. काँग्रेस वर्किंग कमिटी असे यास नाव देण्यात आले आहे. या यादीत देशभरातील ३९ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील ८ नेत्यांना सामील केले आहे. मात्र गेल्या समितीमध्ये सामील असलेले वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना या कमिटीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. सोबतच नव्या वर्किंग कमिटीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचाही समावेश नाही.
 
मल्लिकार्जुन खर्गे यांनी या समितीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रातून मुकुल वासनिक आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. यांच्याशिवाय महाराष्ट्रातील आणखी नेत्यांना केवळ निमंत्रित म्हणून संधी देण्यात आली आहे.
 
तर, अविनाश पांडे हे महासचिव, रजनीताई पाटील आणि माणिकराव ठाकरे प्रभारी म्हणून समितीवर असतील. तर, चंद्रकांत हंडोरे कायम निमंत्रित म्हणून समितीवर असणार आहेत. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांना विशेष आमंत्रित म्हणून संधी देण्यात आली आहे.
 
 
काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीतील ३९ सदस्यांची यादी
 
मल्लिकार्जुन खरगे,सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी. चिदम्बरम, तारिक अन्वर, पु. लालथनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंह चन्नी, प्रियांका गांधी वाड्रा, कुमारी शैलजा, गईखंगम गंगमई, एन. रघुवीरा रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश ठाकोर, जीए मीर, अविनाश पांडे, दीपा दास मुन्शी, महेंद्रजीत सिंह मालविय, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसैन, कमलेश्वर पटेल, के. सी. वेणुगोपाल.
 
Powered By Sangraha 9.0