एयर इंडियामध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांकरिता भरती सुरु, आजच अर्ज करा

21 Aug 2023 16:25:29
AIESL Nagpur Bharti 2023

मुंबई :
एयर इंडियात नोकरीची संधी निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, एयर इंडियातील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एयर इंडियामध्ये विमान तंत्रज्ञ (देखभाल / इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. दरम्यान, अर्ज सुरू तारीख ११ ऑगस्ट २०२३ रोजी झाले असून शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ असणार आहे.

तसेच, या रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://aiesl.airindia.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करायचे आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येणार असून खुला प्रवर्ग आणि ओबीसी याकरिता १००० रुपये तर एससी/एसटी/माजी सैनिक उमेदवारांकडून ५०० रुपये असणार आहे. तर उत्तीर्ण उमेदवारास नोकरीचे ठिकाण हे नागपूर असणार आहे.






Powered By Sangraha 9.0