ठाणे महापालिका चषक राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

20 Aug 2023 16:39:04
Thane Municipality Corporation Prize Distribution

ठाणे :
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर अपूर्व सलकडे (आउटलूक) यांना वृत्त विभागातील पहिले पारितोषिक जाहीर झाले आहे. तर, दैनदिन जीवन या विभागात मोनी शर्मा (एएफपी) यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.

तसेच, लॅण्डस्केप विभागात लाझरस पॉल (मुक्त छायाचित्रकार) यांना पहिले पारितोषिक मिळाले आहे. तर,जिल्हास्तरीय स्पर्धेत मनोज सिंग यांनी बाजी मारली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

या स्पर्धेत देशभरातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरुन एकूण ३१९६ प्रवेशिका आल्या. त्यातून सुमारे १४००० छायाचित्रेत स्पर्धेत सहभागी झाली. यापैकी २१० निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ठाण्यातील तीनहात नाका येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरवण्यात आले आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.


Powered By Sangraha 9.0