राजकुमार राव पुन्हा हटके भूमिकेत, ‘गन्स अँड गुलाब्स’चा ट्रेलर झाला प्रदर्शित

02 Aug 2023 20:00:07

rajkumar rao






मुंबई :
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या राजकुमार राव याची आगामी वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारच्या ‘गन्स अँड गुलाब्स’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होतीच. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलरसाठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन सोबत राजकुमार राव अशी कलाकारांची फौज हा चित्रपटात झळकणार आहे.
 
‘गन्स अँड गुलाब्स’ हा चित्रपट ९०च्या दशकात नेणारी ही मालिका आहे. ज्यात राजकुमार विनोद भूमिकेत दिसणारम असून यात त्याच्या लांब केस, एक चकचकीत जाकीट असा हटके लूक असणार आहे. नेटफ्लिक्सने 'गन्स अँड गुलाब्स'चा ट्रेलर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'तुमची पिस्तूल तयार ठेवा कारण जास्त रोमान्स, कॉमेडी आणि अॅक्शन कुठेही मिळणार नाही.' 'गन्स अँड रोझेस' ही क्राईम-रोमँटिक-ड्रामा ९० च्या दशकातील गुन्हेगारीवर आधारित आहे मालिका आहे. सुमन कुमार यांनी कथा लिहिली आहे. ही वेब मालिका १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0