चंदीगड : हरियाणाच्या मेवातमध्ये सोमवारी (३१ जुलै २०२३) हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. त्याचवेळी डझनभर वाहने पेटवून देण्यात आली. या दंगलीतील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक जखमी हरियाणा पोलिस कर्मचारी नूह दंगलीची माहिती देत आहे.
व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या डोक्यावर पट्टी बांधलेली असून इतर पोलिस त्याच्याभोवती उभे आहेत. अंकुर सिंह नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी असे म्हणताना दिसत आहे, “मिरवणूक नेहमीप्रमाणे सुरू होती. त्यानंतर लगेचच जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली.
मेवातमध्ये सोमवारी (३१ जुलै २०२३) प्रचंड हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन होमगार्ड जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. डझनभर पोलिसांसह जखमींची संख्या ६० हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेत सहभागी असलेल्या पोलिसांसह ३० हून अधिक वाहनांची तोडफोड किंवा जाळपोळ करण्यात आली आहे.