विक्रोळीकरांना मिळणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय

02 Aug 2023 17:44:59
Mahatma jyotirao Phule Hospital Redevelopment

मुंबई
: विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवारनगर येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात काढणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या महिन्याभरात संबंधित कामाची निविदा काढण्यात येईल असे सांगतानाच यासंदर्भातील कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु असून येत्या महिन्याभरात या बाबतची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0