मैत्री, प्रेम मग धर्मांतर? प्रेमाखातर श्रवण कुमार झाला मौलवी!

    02-Aug-2023
Total Views |
Hindu man converts to Islam after falling in love with a Muslim girl

पाटना : बिहारमधील सिवान जिल्ह्यात एका हिंदू तरुणाने मुस्लिम तरुणीच्या प्रेमाखातर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मात्र, दुर्दैवाने या प्रकरणातही मुलीवर मुस्लिम मुलाच्या प्रेमाप्रमाणेच जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि हिंदू मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर झाल्याचे म्हटले आहे.
 
हे प्रकरण सिवानमधील मैरवा येथील मिस्करही परिसरातील आहे. नयना देवी नावाच्या एका महिलेने आरोप केला आहे की, तिच्या वस्तीत राहणाऱ्या एका मुलीने तिचा मुलगा श्रवण कुमारला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुस्लिम बनवले आहे. श्रवण कुमार हा २३ वर्षीय तरुण ७ महिन्यांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. तो परत आला तेव्हा त्याची सगळी वागणूकच बदलली होती. त्याने दाढी आणि टोपी घातली होती आणि मौलानासारखे कपडे घातले होते. दरम्यान तरुणाच्या आईने आपल्या मुलच्या घरवापसीची मागणी केली आहे. या संदर्भात तरुणाच्या आईने १३ जुलै रोजी मैरवा पोलीस ठाण्यात अर्जही दिला आहे.

दुसरीकडे, रोझी या मुस्लिम मुलीने तिच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. श्रवण हा त्याचा शेजारी होता, त्यामुळे ते दोघे मित्र असल्याचे त्याने म्हटले आहे. तेही आपापसात बोलायचे. दोघेही फोनवर बोलत असत, पण जेव्हापासून तिच्या घरच्यांनी तिला श्रवणशी बोलण्यापासून रोखले तेव्हापासून तिचा त्याच्याशी संपर्कच राहिला नाही. त्याचा मुस्लिम होण्यात कोणचाही हात नाही. रोझी सांगते की ती स्वतः इस्लामची माहिती गोळा करायची आणि पुस्तके वाचायची.

दरम्यान, श्रवण कुमारचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो सर्व आरोप फेटाळताना दिसत आहे. श्रवण कुमार म्हणतो की त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. हे त्याने ना कोणाच्या दबावाखाली केले आहे ना कोणत्याही मुलीच्या प्रेमात. आपण जे काही केले किंवा करत आहोत त्याला आपणच जबाबदार आहोत.. तो म्हणाला की, मी एक प्रौढ व्यक्ति आहे. मी स्वत : चे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. आता मला कोणाशीही काही घेणंदेणं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. श्रवण कुमारलाही आईसोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही, यावर लोक टीका करत आहेत. श्रवण कुमार खरेच मुस्लिम झाला असला तरी त्याने आईशी संपर्क तोडू नये, असे उलेमांचे म्हणणे आहे. इस्लाम याला परवानगी देत ​​नाही.