नवी दिल्ली : 'कॅग'च्या अहवालामुळे देशभरात एकच खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येणाऱ्या रस्ते वाहतूक महामार्गाच्या बांधणीच्या खर्चाचे आकडे लेखापरीक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, कॅगच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या आरोपांचे खंडन केले असून त्यांच्या आरोपांवर स्पष्टता दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आमचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून त्यांनी केलेल्या मुद्द्यांमध्ये कसूर आढळल्यास द्याल ती शिक्षा मंजूर असेल 'कॅग'च्या मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, द्वारका एक्सप्रेस-वेच्या निर्माणामध्ये कंत्राटामध्ये १२ टक्क्यांहून कमी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे 'कॅग'ने जे सांगितले आहे की, प्रति किलोमीटर २०० कोटींहून अधिक खर्च झाल्याचे अहवाल सांगतो, उलटपक्षी प्रति किलोमीटर १८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधकांच्या आरोपावर गडकरी म्हणाले, आमचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून आम्ही केलेल्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्यात आला नसल्याचे केंद्रीय नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, आम्ही केलेल्या कामावर 'कॅग'ने तसं प्रमाणपत्र द्यावं, त्यामुळे विरोधकांनी बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत, असेही गडकरी यावेळी म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यकाळात देशात असंख्य रस्ते आणि महामार्गांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे 'कॅग'च्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.