मुंबई : राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येसंदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केले असून ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा आधार द्यावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांवर असंख्य संकटं असून शेतकरी आभाळाखाली शेती करणारी एकमेव जात असल्याचे ते म्हणाले. राज्य शासनाकडून विम्याचा हफ्ता भरल्याचे देखील मुंडे यावेळी म्हणाले.
दरम्यान, या आत्महत्याग्रस्त मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत, या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. तसेच, या भेटीदरम्यान, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, राज्यात शेतकऱ्याची आत्महत्या केवळ यवतमाळमध्ये होत नसून संपूर्ण राज्यभर होतात, असेही ते म्हणाले.