फोटोग्राफी हा माझा श्वास; उद्धव ठाकरेंतर्फे फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा!

19 Aug 2023 16:20:26
Former CM Uddhav Thackeray On World Photography Day

मुंबई :
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उत्तम छायाचित्रणकारसुध्दा आहेत हे सर्वांनाच माहित आहे. राजकारणाव्यतिरिक्त हा कलागुण त्यांच्या अंगी आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या करिअरची सुरुवात छायाचित्रणापासून सुरु केली आहे. १८ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून गणला जातो. छायाचित्रण कलेविषयी सबंध जगाला माहिती मिळावी यामुळे हा दिवस पाळण्यात येतो.

दरम्यान, जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे उध्दव ठाकरेंचे छायाचित्रणावर किती प्रेम आहे याचा प्रत्यय येतो. दरम्यान, ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज जागतिक छायाचित्रण दिन.सृष्टीतले सौंदर्य विविध अंगांनी टिपू पाहणाऱ्या प्रत्येकास जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0