‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, मोडला ‘केजीएफ २’चा रेकॉर्ड

18 Aug 2023 17:21:57
 
gadar and kgf
 
 
 
मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. २०२३ या वर्षात कमालीची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'गदर २' ने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २८४.६३ कोटींची कमाई करत 'केजीएफ २' आणि 'बाहुबली २' या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. लवकरच हा चित्रपट ३०० कोटींच्या घरात पोहचणार आहे.
 
अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ या चित्रपटाने रविवारी कमाईच्या बाबतीत 'केजीएफ २' आणि 'बाहुबली २' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा शाहरुख कानटा पटाण चित्रपट होता, त्या चित्रपटाने ५८.६ कोटी रुपये कमावले होते. त्याच्यामागे आता गदर २ चा क्रमांक लागला असून या चित्रपटाने ५२ कोटी रुपयांची कमाई करत केजीएफ २ आणि बाहुबली २चा रेकॉर्ड मोडला आहे. केजीएफने ५०.५३ रुपयांची कमाई केली होती तर बाहुबली चित्रपटाने ४६.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. गदर २ चित्रपटाने ५२ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
 
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱा चित्रपट म्हणून मान मिळवला होता. 'गदर २' या चित्रपटाने पाचव्या दिवशी ५५.४० कोटींची कमाई केली आहे.
 
पहिल्या दिवशी चित्रपटाने ४०.१० कोटी, दुसऱ्या दिवशी ४३.०८, तिसऱ्या दिवशी ५१.७० कोटी तर पाचव्या दिवशी ५५.४० कोटींचा व्यवसाय करत ‘गदर २’ने पाच दिवसांची एकूण बॉक्स ऑफिसवरील कमाई २२८.९८ कोटी इतकी केली आहे. अनेक हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड गदर २ चित्रपटाने मोडून काढला आहे. सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ७६.६५ कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली होती.
Powered By Sangraha 9.0