कोविड सेंटर घोटाळ्यात अडकलेला सुजित पाटकर नेमका आहे तरी कोण?

18 Aug 2023 14:03:22
 
Sujit Patkar
 
 
मुंबई : सुजीत पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. पाटकर हे पेशाने व्यावसायिक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.
 
बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर प्रकरण चर्चेत आले होते. याप्रकरणी ईडीने मुंबईत तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचे म्हटले होते. ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावं होती.
 
लाईफ सायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते. कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुजीत पाटकर यांना आता अटक केली आहे. याअगोदर सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने त्यांना अटक केली होती. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0