देशातील पहिले थ्रीडी प्रिंटेड टपाल कार्यालय; पंतप्रधानांची ‘एक्स’वर पोस्ट

18 Aug 2023 19:42:14
PM Modi On 3D Printed Post Office

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउट येथील भारतातील पहिले थ्रीडी प्रिंटेड टपाल कार्यालय आपल्या देशाचा नवोन्मेष आणि प्रगतीचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी त्याविषयी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. त्यांनी म्हटले की, प्रत्येक भारतीयाला बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउट येथील भारताचे पहिले थ्रीडी प्रिंटेड टपाल कार्यालय पाहून अभिमान वाटेल. हे कार्यालय आपल्या देशाचा नवोन्मेष आणि प्रगतीचा एक पुरावा असून आत्मनिर्भर भारताच्या भावनेला देखील मूर्त रूप देते. हे कार्यालय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम केले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन, असेही पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0