देशात पहिल्या ३D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा श्रीगणेशा!

18 Aug 2023 17:00:42
3D Printed Post Office

नवी दिल्ली
: देशात ३D प्रिंटिंगचा वापर अनेक क्षेत्रात करण्यात आलायं. पण आता या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन देशात आता ३D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा श्रीगणेशा करण्यात आलायं. बेंगळुरु शहरात हे पहिले ३डी पोस्ट ऑफिस तयार होतयं. या ३D पोस्ट ऑफिसची निर्मिती लार्सन एंड टूब्रो ही कंपनी करतेय.ह्या कंपनीने भारतातील अनेक इमारतीच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान वापरले आहे. ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. हे पोस्ट ऑफिस तयार करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र या ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बांधकाम खर्चात २५ टक्के कपात होणारय. तसेच ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही इमारत झटपट तयार होईल.

३D प्रिंटिंग म्हणजे काय?

३D प्रिंटिंग हे एक कम्युटरद्वारे निर्मित डिझाईन आहे. त्यामुळे लेअर टू लेअर, थ्री डायमेन्शिनल डिझाईन तयार करण्यात येते. अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग वर हे ३D प्रिंटिंग अवलंबून असते.सध्या प्रिटिंग मशीनमध्ये शाई आणि कागदाचा वापर होतो. तर ३D प्रिंटिंगसाठी वस्तूचा आकार, रंग निश्चित करण्यात येतो. त्यानुसार पदार्थ टाकण्यात येतात. ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर खास करुन सुरक्षा आणि एअरोस्पेससाठी करण्यात येतो.

आता समजून घेऊ ३D प्रिंटिंग का महत्वाचे आहे?

३D प्रिंटिंगचा उपयोग छोट्या शहरातील औद्योगिक विकासासाठी करण्यात येतो. त्यामुळे लघू, मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे वेळेची बचत तर होईलच पण खर्चही वाचेल. तसेच या इमारती पर्यावरणपूरक असतील. त्यामुळे ३D पोस्ट ऑफिसबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.



Powered By Sangraha 9.0