इंधन दर नियंत्रित करण्यासाठी मोदींची लवकरच उच्चस्तरीय बैठक

17 Aug 2023 17:04:41
Modi
 
 
 
 
इंधन दर नियंत्रित करण्यासाठी मोदींची लवकरच उच्चस्तरीय बैठक 
 
 
नवी दिल्ली:   ब्लुमबर्गचा बातमीनुसार मोदी सरकारने पेट्रोल संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोल किंमतची झळ कमी करण्यासाठी सामान्यांना दिलासा देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे.  कुठल्याही विभागाच्या बजेटला धक्का न लागता महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोल, स्वयंपाक तेल यावरील टॅक्स सरकार कमी करण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे इन्फ्लेशन लिमिट कमी केल्यानंतर आता पेट्रोल डिझेल, गॅस किंमतीवर नियंत्रणासाठी सरकारने कंबर कसली आहे.  परंतु सरकारकडून या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
 
 
 
जुन महिन्यात टोमॅटोची किंमत आटोक्यात येऊन देखील जुलै महिन्यात टोमॅटोची भाववाढ कायम राहिली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर फेडरल रिझर्वचा परिणाम म्हणून महागाई उच्चांक वाढला होता.  टोमॅटोचा भावाबरोबर आता इंधनावरील टॅक्स कमी केल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळेल.
 
 
 
नक्की किती रुपयांची टॅक्स सवलत मिळेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
 
Powered By Sangraha 9.0