मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणार सीबीआयचे 'स्पेशल ५३'

17 Aug 2023 11:36:11
 CBI
 
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या तपासासाठी सीबीआयने तपास अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या तपास पथकात ५३ अधिकाऱ्यांच्या समावेश करण्यात आला. यात २९ महिला अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. राज्यात महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराबाबत ६५ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
 
त्यापैकी ११ प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. मणिपूर हिंसाचाराशी संबंधित आणखी ९ प्रकरणांची चौकशी सीबीआय करणार आहे. मणिपूरमध्ये ३ मेपासून जातीय हिंसाचार सुरू आहे, ज्यामध्ये १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
या तपास पथकात ३ उपमहानिरीक्षकांचा समावेश आहे. हे तीन अधिकारी या तपास पथकाचे नेतृत्व करतील. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) लवली कटियार
२) निर्मला देवी
३) मोहित गुप्ता
 
मणिपूरमध्ये स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सीबीआय आपला तपास लवकरच पुर्ण करुन दोषींवर कायदेशिर कारवाई करेल. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय बलाची तैनाती केलेली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0