गदर चित्रपटाची चर्चा केली म्हणून तौफिक आणि युसूफने केली अमितला मारहाण

17 Aug 2023 12:54:20
Gadar-2 Attack 
 
लखनऊ : बॉलीवूड चित्रपट गदर-२ बद्दल बोलल्यामुळे उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एका तरुणावर हल्ला करण्यात आला. पीडित अमित गुप्ता यांनी तौफिक आणि युसूफ यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. घटनेदरम्यान आजूबाजूच्या लोकांनी हस्तक्षेप केला असता हल्लेखोर अमितला धमकावत पळून गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
 
हे प्रकरण बदायूं जिल्ह्यातील मुसाझाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी माणिकापूर कौर गावातील रहिवासी अमित गुप्ता यांनी पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, एक दिवस अगोदर १४ ऑगस्ट रोजी ते घराजवळ उभे राहून गदर २ चित्रपटाबद्दल बोलत होते.
 
 
यावेळी अचानक तौफिक नावाच्या व्यक्तीने रागात येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अमितने शिवीगाळ करण्यास विरोध केला असता तौफिकने त्याचा भाऊ युसूफला बोलावून घेतले. यानंतर दोघांनी मिळून अमितला मारहाण केली.
आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता. तौफिक आणि युसूफने घटनास्थळावरुन पळ काढला. तेथून निघताना त्यांनी अमितला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अमितच्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हिडिओमध्ये एक जमाव दिसत आहे, ज्यामध्ये महिलांचा समावेश आहे. काही लोक दोन्ही बाजूंना वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी तौफिक आणि युसूफ यांच्यावर भादंवि कलम ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0