चांद्रयान मोहिमेचं मोठं यश!

17 Aug 2023 14:26:07
 chandrayaan 3
 
मुंबई : इस्रोने आज म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे केले. आता प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल तर लँडर-रोव्हर २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
 
इस्रोने सांगितले की लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केल्यानंतर, शुक्रवारी दुपारी ४ वाजता, लँडर डीबूस्टिंगद्वारे थोड्या कमी कक्षेत आणले जाईल. यापूर्वी, चांद्रयान चंद्राच्या गोलाकार कक्षेत फिरत होते ज्यामध्ये त्याचे चंद्रापासून किमान अंतर १५३ किमी आणि कमाल अंतर १६३ किमी होते.
 
प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर लँडर आता डीबूस्ट केले जाईल. म्हणजेच त्याचा वेग कमी होईल. येथून चंद्राचे किमान अंतर ३० किमी असेल. २३ ऑगस्ट रोजी सर्वात कमी अंतरावरून चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
चांद्रयान-३ चा आतापर्यंतचा प्रवास...
१४ जुलै रोजी चांद्रयान १७० किमी x ३६,५०० किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.
३१ जुलै आणि १ ऑगस्टच्या रात्री चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने निघाले.
५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
१६ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ पासून रोव्हरला वेगळे करण्यात आले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0