मुंबई : गेल्या काही वर्षांत पौराणिक, आध्यात्मिक चित्रपट आणि मालिका मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत. १९८७ साली रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिने अनोखा इतिहास रचला. आता पुन्हा एकदा नवा इतिहास कोरण्यासाठी रामायण छोट्या पडद्यावरून उलगडले जाणार आहे.
‘सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन’ने रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याचा शिवधनुष्य उचलले आहे. ‘श्रीमद् रामायण’ असं या मालिकेचं नाव असून नुकतीच या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.
या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात दिव्यांनी लखलखलेली अयोध्या नगरी दिसत आहे. तर या प्रोमोच्या शेवटी पाठमोरी उभे असलेली श्रीरामांची छायाही दिसत आहे. पुढील वर्षी जानेवारीत ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत कोणते कलाकार झळकणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.