पश्चिम महाराष्ट्रात कुठे जाणवले भूकंपाचे धक्के?

16 Aug 2023 11:26:15
 
earthquake shocks
 
 
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली अभयारण्य परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज (१६ ऑग.) पहाटे 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.
 
कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर हे भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0