खोक्यांचा आरोप करणाऱ्यांकडे कंटेनर : राज ठाकरे

16 Aug 2023 20:27:39
Raj Thackeray on Uddhav Thackeray
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाने ५० खोके घेतले असा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरसा दाखवला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेबाबत पनवेल येथे बुधवारी राज ठाकरेंनी एक मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना राज यांनी उबाठा गटावर निशाणा साधला असून ''इतरांवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांकडे कंटेनर आहेत,'' असे म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, "सगळ्या लोकांना माहित आहे, आम्ही कसेही वागलो, खराब रस्ते दिले तरी वेगळ्या मुद्दा काढून मत घेणार. हा धंद्दा झाला आहे. पुढील 25 वर्ष नीट रस्ता झाला तर पैसे खायचे कसे, म्हणून खराब रस्ते बनतात. टेंडर, टक्केवारी सुरु आहे. खोक्याच्या नावाने ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत. यांनी कोविड पण सोडला नाही,'' अशी टीका राज यांनी केली आहे.


Powered By Sangraha 9.0