पाटणा : बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये मंगळवारी (१५ ऑगस्ट २०२३) स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्लामी ध्वज फडकवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मझौलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. उच्च माध्यमिक शाळेत तिरंगा फडकवल्यानंतर काही तरुणांनी इस्लाम धर्माचा ध्वज फडकावला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी बिहार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. इस्लामी ध्वज फडकावणारे तरुण मुस्लिम समाजाचे आहेत. घटना सीताराम प्लस टू उच्च माध्यमिक विद्यालयाची आहे, जिथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. १५ मिनिटांनंतर काही मुस्लिम तरुणांनी इस्लामिक ध्वज घेऊन शाळेच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या या कृत्याला शिक्षक आणि स्थानिक लोकांनी कडाडून विरोध केला.
यादरम्यान गदारोळ झाला आणि याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. माझौलिया पोलिस आल्याची माहिती मिळताच काही तरुणांनी तेथून पळ काढला. मात्र, त्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेला २४ वर्षीय तरुण शाहिद हसन हा इयत्ता ११ वीचा विद्यार्थी असून जोकतिया गावचा रहिवासी आहे. त्याने ध्वजारोहणाच्या वेळी काही आक्षेपार्ह घोषणाही दिल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हा संपूर्ण प्रकार शाळेच्या आवारातच घडला. मुख्याध्यापक अशोक कुमार यांनी असामाजिक तत्वांच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटप केल्याचा आरोप आहे. अशोक कुमार सांगतात की, एका बदमाशाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.