"मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण..."

16 Aug 2023 18:15:28
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही. असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना काढला आहे. ठाण्यात बुद्धिबळ स्पर्धा होती, यासाठी पद्मविभूषण बुद्धिबळपट्टू विश्वनाथ आनंद आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी हल्लाबोल केला आहे.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "काही विरोधक तिरकी चाल चालतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. मात्र जनता आपल्यासोबत असल्याने विरोधक नेहमी चितपट होतात. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्या सारख्या नेत्यांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर बोललात. ठाण्यात समाजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे आहेत." असे शिंदे म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0