चांद्रयान-३ पोहोचले चंद्राच्या आणखी जवळ ; २३ ऑगस्ट रोजी करणार सॉफ्ट लँडिंग

16 Aug 2023 16:32:48

chandrayan-3


मुंबई :
नुकतीच इस्त्रोने चांद्रयान-३ आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले असल्याची माहिती दिली आहे. १७ ऑगस्ट रोजी चांद्रयानाचे प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होणार आहे. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-३ पाठवण्यात आले होते.

 
त्यानंतर आता ते चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. सध्या चांद्रयान-३ हे चंद्रापासून अवघ्या १०० किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता लवकरच प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे केले जाईल. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. ही मोहिम पूर्ण झाल्यास भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे.





Powered By Sangraha 9.0