SSC CPO Recruitment 2023 : आजच अर्ज करा

15 Aug 2023 16:09:58
Staff Selection Comission CPO Recruitment 2023

मुंबई
: स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) अंतर्गत सीपीओ पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस केंद्रीय पोलिस संघटना आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक (एक्झिक्युटिव्ह आणि जीडी) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्रीय सशस्त्र दलाच्या आणि दिल्ली पोलीसांच्या उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा भरल्या जाणार आहेत. या करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ ऑगस्ट २०२३ आहे.

दरम्यान, शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवाराचे वय हे २०-२५ वर्षे असावे. तसेच, जनरल वर्गातील उमेदवारास १०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. तर महिला उमेदवार, एससी, एसटी आणि माजी सैनिक आरक्षणासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. एसएससी सीपीओ भरती २०२३ बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in भेट द्या, तसेच, ऑनलाईन अर्ज आजच भरा.





 
Powered By Sangraha 9.0