अंजूनंतर राजस्थानची दीपिका इरफानसोबत कुवेतला पोहोचली,त्यानंतर केलं धर्मांतर! फोटो व्हायरल

15 Aug 2023 14:43:12
Rajasthan woman elopes to Kuwait

जयपूर : दोन मुलांना आणि पतीला राजस्थानमध्ये सोडून पाकिस्तानात जाऊन निकाह केलेली अंजू सध्या चर्चेत आहे. आता राजस्थानच्या डूंगरपुर जिल्ह्यातील दीपिका कुवेतला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. ती दोन मुलांची आई देखील आहे. दरम्यान इरफान हैदरवर तिचे कुवेतला नेऊन धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
 
दीपिका १० जुलैपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी पतीने १३ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र आता दीपिकाचा बुरख्यातील फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे. हे प्रकरण डुंगरपूरच्या चित्री पोलीस स्टेशन हद्दीतील भेमाई गावाशी संबंधित आहे.
 
दीपिकाचा पती मुंबईत काम करतो. १४ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. दीपिकाची पत्नी गावातच राहायची. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिच्या पतीने सांगितले आहे की, दीपिका आजारपणाच्या बहाण्याने गुजरातमधील खेड ब्रह्मा येथे जात असे. १० जुलै रोजीही ती हेच सांगून घरातून निघून गेली. त्याच दिवशी संध्याकाळी दोघांमध्ये शेवटचे बोलणे झाले.

पीडितेच्या पतीच्या म्हणण्यानुसार,यानंतर त्याने दीपिकाशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. बुरख्यात पत्नीचा फोटो मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फोटोत तिच्यासोबत असलेल्या तरुणाचे नाव इरफान हैदर आहे. इरफान हा गुजरातमधील हिम्मतनगर जिल्ह्यातील नवानगरचा रहिवासी आहे. इरफान हैदरने पीडितेच्या पत्नीचे पत्नीचे ब्रेनवॉश करून तिला कुवेतला नेऊन धर्मांतर केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. नाव बदलून इरफानने महिलेशी ओळख वाढवली, असेही तक्रारीत म्हटले आहे.

मंगळवारी (१४ ऑगस्ट २०२३) डुंगरपूरच्या सर्व समाजाने या विषयावर बैठक घेतली. बैठकीनंतर पोलीस अधीक्षक डुंगरपूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात महिलेला तिच्या पतीकडे परत देण्यासोबतच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 
Powered By Sangraha 9.0