रविवारी वसईत रंगणार एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धा

15 Aug 2023 18:00:58
Competition


वसई
ः अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mono Acting Competition
Powered By Sangraha 9.0