'आयटीआय'च्या माध्यमातून जागतिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

15 Aug 2023 18:03:32
Maharashtra CM Shinde Inaugurated ITI Virtual Classroom

मुंबई :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या संकल्पनेतील संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्धाटन केले. तसेच, कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण मिळत असून जगातील अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयटीआयमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आयुक्त डॉ रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची उपस्थिती होती. तर राज्यातील विविध आयटीआयमध्ये लोकप्रतिनिधींसह ७५ आयटीआयचे प्रशिक्षणार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.



Powered By Sangraha 9.0