अदानी हिंडनबर्ग केस - फिर एक तारीख?

14 Aug 2023 12:58:51
SEBI
 
 
 
अदानी हिंडनबर्ग केस - फिर एक तारीख?
 

मुंबई :    न्यायालयाचा निर्दशननानुसार, सेबीला १४ ऑगस्ट ही अदानी हिंडनबर्ग केसच्या तपासासाठी अंतिम तारीख दिली होती.  या प्रकरणी सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने वाढीव १५ दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली आहे. युएस शोर्टसेलर हिंडनबर्ग रिसर्चचा खळबळजनक दाव्यांनंतर औद्योगिक विश्वात खळबळ माजली होती. यानंतर न्यायालयाने हा तपास सेबीकडे वर्ग केला होता.  वेळोवेळी अदानी ग्रुपने या रिपोर्टचे खंडन करून हे भारताविरुद्ध आणि कंपनी विरूद्ध षडयंत्र असल्याचे सांगितले होते.
 
 
स्वतः गौतम अदानी यांनी कंपनीची आर्थिक तब्येत व्यवस्थित असून पारदर्शक आणि गतिमान बँलन्सशिट असून कंपनीत काही चुकीचे नसल्याचे एका व्हिडियो निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते.  सेबीकडून २४ प्रकरणातील चौकशी करण्यात आली आणि त्यातला १७ प्रकरणात तपास पूर्ण झाला आहे.
 
 
या आधी सेबीने न्यायालयाकडे मे मधल्या सुनावणीत सेबीने वाढीव मुदत मागितली होती. न्यायालयाने ती मान्य करत १४ ऑगस्टपर्यंत पुढील तपास करण्याचे आदेश दिले होते. आता सेबीने थोडा अधिकचा कालावधी न्यायालयात मागितला आहे.
 
 
जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग रिपोर्टनंतर न्यायालयात ४ जनहित याचिका दाखील झाल्या होत्या.अदानी ग्रुपकडूनही प्रतियाचिका दाखल झाली होती. सेबीकडून आता मागण्यात आलेल्या मुदतवाढीबददल न्यायालय आतापर्यंत सेबीने काय तपास केला हे बघून तारखेबाबत निर्णय घेईल असे समजत आहे.
Powered By Sangraha 9.0