निपकोचा अरूणाचल प्रदेश सरकारबरोबर हायड्रोप्रोजेक्ट साठी सामंजस्य करार

13 Aug 2023 00:57:04
NTPC
 
 
 
 
निपकोचा अरूणाचल प्रदेश सरकारबरोबर हायड्रोप्रोजेक्ट साठी सामंजस्य करार
 

नवी दिल्ली :   नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) ची १०० टक्के सबसिडरी असलेल्या निपको (नॉर्थ ईस्टन इलेक्ट्रिकल पॉवर कार्पोरेशन) ने अरूणाचल प्रदेश सरकारबरोबर २६२० मेगावॉट हायड्रो प्रोजेक्ट साठी १२ ऑगस्ट २०२३ ला सामंजस्य करार केला आहे. या प्रोजेक्टमुळे २६२० मेगावॉटचे लक्ष पूर्ण केले जाईल.
 
 
या शिवाय एन डी सी (नॅशनली डिटरमाईन कंट्रीब्युशन) उपकमाशी संलग्न असलेल्या भारतातील ग्रीन एनर्जीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. या एनडीसीने २०३९ मध्ये ५०० गिगावॉट नॉन फॉसिल एनर्जी निर्माण करण्यास शक्य होईल. देशातील कार्बन फुटप्रिंट कमी करून २०७० सालचे नेट झीरो इमिशन हे पूर्ण होण्यास याचा हातभार लागेल.
 
पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच तिकडील भागाची आर्थिक दृष्ट्या प्रगती होणे शक्य होणार आहे. याचा फायदा नजीकच्या भागातील लोकांना रोजगार निर्मितीसाठीही निश्चितच होईल. बदलत्या काळानुसार इथे रोजगार कौशल्य विकासासाठी एक संधी निर्माण होऊ शकते.
 
या करारामुळे, हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पा बरोबरच हरितता आणि क्लीन रिन्यूएबल बरोबर टिकाऊ एनर्जी निर्मितीसाठी या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
Powered By Sangraha 9.0