ठाण्यात बुद्धिबळ स्पर्धेला ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद हजेरी लावणार

13 Aug 2023 19:41:56
Former World Champion Viswanathan Anand In Thane

ठाणे
: ग्रॅण्डमास्टर पद्मविभूषण विश्वनाथन आनंद दि. १५ ऑगस्ट रोजी ठाण्यामध्ये येत असून एकाच वेळी २२ बुद्धिबळपटूंना त्यांच्याशी मुकाबला करण्याची संधी मिळणार आहे.

रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अ‍ॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या एक दिवसीय उपक्रमात ५०० जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. टिपटॉप प्लाझा येथे सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी दुपारी २ वाजता विश्वनाथन विरुद्ध २२ हा प्रदर्शनीय सामना कोरम मॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

सुमारे अडीच लाख रुपयांची बक्षिसे आणि ८० मानचिन्हे देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. रोटरीच्या या उपक्रमासाठी ग्रँड मास्टर विष्णू प्रसन्न, अभिजीत कुंटे, दीपेश चक्रवर्ती, इंटरनॅशनल मास्टर रत्नकिरण, शरद टिळक, विक्रमादित्य कुलकर्णी, कुशाग्र कृष्णत्तर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कनव्हेनर मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष मनन वोरा आणि अपस्टेप अकॅडमीचे सलिल घाटे यांनी कळविले आहे.


 
Powered By Sangraha 9.0