महाराष्ट्राच्या युवकांना हक्काचा मंच मिळणार; त्यांच्या विचारांचा सन्मान होणार!

13 Aug 2023 09:28:07

Competition For Youth

मुंबई : राज्यात भाजपकडून आझादी का अमृत महोत्सवानिमित्त तरुणाईसाठी अनेक स्पर्धा जाहीर केल्या आहेत. त्यामाध्यमातून राज्यातील तरुणाईला हक्काचा मंच मिळणार असून त्यांच्या विचारांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. दरम्यान, 'डेव्हलोपमेंट फाऊंडेशन फॉर महाराष्ट्र' द्वारे आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाजप नेत्यांकडून आवाहन करण्यात येत आहे. याकरिता स्वतः कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भआत ट्विट केले असून त्यांनी राज्यातील तरुणाईला एकप्रकारे 
 
 
 
 
#AzadiKaAmritMahotsav निमित्त डेव्हलोपमेंट फाऊंडेशन फॉर महाराष्ट्र' द्वारे आयोजित

🔸महाराष्ट्राचा दमदार वक्ता
🔸महाराष्ट्राचा दमदार लेखक
🔸महाराष्ट्राचा रिल्सस्टार
🔸महाराष्ट्राचा मीमर

या स्पर्धांमध्ये नक्की सहभागी व्हा!
 
वक्तृत्व स्पर्धेसाठी विश्वगुरु भारत, महाराष्ट्राच्या राजकीय आराखड्यातील खरा पैलवान, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी राजकीय स्थिरता, शेतकऱ्यांच्या हितासाठी जलनीती आणि व्हिजन महाराष्ट्राच्या विकासाचे असे विषय निवडण्यात आले आहेत. तर, यासाठी प्रथम पारितोषिक ५१,०००, द्वितीय पारितोषिक ३१,०००, तृतीय पारितोषिक २१,००० चे देण्यात येणार आहे.
 
रील स्पर्धेसाठी वयोमर्यादा १७ ते २८ आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ५१,०००, द्वितीय पारितोषिक ३१,०००, तृतीय पारितोषिक २१,००० चे देण्यात येणार आहे. तर, ही स्पर्धा केवळ महाराष्ट्र राज्यापुरतीचं मर्यादित असेल. याशिवाय, मीम स्पर्धेसाठी विषय राजकीय असावेत.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0