'रामायण खोटे, पैसे कमवण्यासाठी बांधले मंदिर'; शिक्षकाने केला हिंदू देवी-देवतांचा अपमान

12 Aug 2023 18:41:52
ramayana 
 
गांधीनगर : गुजरातमधील वडोदरा येथे रामायणाला 'बनावट' संबोधून भगवान हनुमानाच्या मूर्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील एक विद्यार्थी हनुमानजींच्या दर्शनासाठी गेला होता, त्यामुळे तो शाळेत येऊ शकला नाही. यावर शाळेतील शिक्षकाने रामायण आणि हनुमानाबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या. हिंदू संघटनांनी याचा निषेध करत आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण वडोदरा येथील मकरपुरा येथील न्यू एरा स्कूलशी संबंधित आहे. बजरंग दल तरसाली ब्लॉकचे संयोजक कृष्णा उदे सिंह सांगतात की, इयत्ता ७ वी चा विद्यार्थी शाळेत गेला नाही. दुसऱ्या दिवशी शिक्षकाने विचारले की सुटी का घेतली? यावर विद्यार्थ्याने सांगितले की, सळंगपूर येथे हनुमानाच्या मंदिरात गेलो होतो. यानंतर शिक्षिकाने सळंगपूरमध्ये असलेल्या हनुमानजींच्या मूर्ती आणि रामायणावर असभ्य टिप्पणी केली.
 
सळंगपूरमधील हनुमानजींची मूर्ती पैसे कमवण्यासाठी बनवण्यात आल्याचे शिक्षकाने सांगितले. एवढेच नाही तर शिक्षकाने रामायण हे बनावट आणि खोटे आहे, असही विधान केले. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही बाब कळताच त्यांनी शाळेला भेट दिली. यानंतर आरोपी शिक्षकासमोर त्यांनी विद्यार्थ्याशी बोलणे केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून शाळा व्यवस्थापनाने आरोपी शिक्षकाकडून स्पष्टीकरण मागितले होते. शिक्षकाने लेखी माफीनामा शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला आहे.
 
वडोदराच्या जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी फोनवर बोलणे झाल्याचे कार्यालयाचे शिक्षण निरीक्षक म्हणाले. मात्र, मुख्याध्यापकांना लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. डीईओंनीही चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0