मनोज सिन्हा यांनी घेतली देवी कुटुंबीयांची भेट

12 Aug 2023 09:35:08
Manoj Sinha Met RSS Madandas Devi Family

मुंबई
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी अनेक मान्यवर आणि नेते मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र त्यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या मदनदासजींच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील त्यांच्यासह उपस्थित होते.

विनोद तावडे यांचे ट्विट :

"उच्च पदावर विराजमान होऊनही आपला पाया न विसरणे, हे उत्तम कार्यकर्ता असण्याचे मोठे लक्षण आहे; हे मी आज अनुभवले. जम्मू-काश्मीरचे माननीय लेफ्टनंट गव्हर्नर मनोजजी सिन्हा हे रा.स्व.संघाचे प्रचारक माननीय मदनदासजी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या त्यांच्या मूळ गावी जाऊन मदनजींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी आपल्या व्यस्त जीवनातून निभावलेले हे दायित्व अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा नक्कीच देईल."





Powered By Sangraha 9.0