बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

11 Aug 2023 13:07:59

Dhule Dangal


धुळे :
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
 
सांगवी गावात आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांचे अभिवादनपर फलक लावण्यात आले होते. गुरुवारी दुपारी त्यातील एक बॅनर फाडल्याची माहिती आदिवासी वस्तीत कळली. यातून तणाव पसरला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची झाली.
 
दुपारी घडलेल्या या घटनेचा सायंकाळी पुन्हा उद्रेक झाला. यावेळी हिंसक जमावाने रास्ता रोको केला. जमावाने रात्री दहा वाजेनंतर महामार्ग रोखून धरल्याने परिस्थिती आणखी चिघळली. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. यामध्ये दोन्ही गटाकडून काठ्यांचा वापरही करण्यात आला.
 
शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे जमावाची समजूत काढण्यासाठी गेले असता त्यांच्या वाहनावर जमावाने दगडफेक केली. यात तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाडीचे चालक आरिफ शेख जखमी झाले आहेत.


Powered By Sangraha 9.0