रजनीकांत सोबत ‘जेलर’ चित्रपटात झळकले दोन मराठी कलाकार

11 Aug 2023 11:41:00
 

rajanikanth 
 
 
 
 मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते जगभरात आहेत. १० ऑगस्ट रोजी देशभरात रजनीकांतचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. थलायवाच्या अर्थात रजनीकांत यांच्या चित्रपटाची त्यांचे चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहात असतात. तशीच चाहत्यांना आतुरता त्यांच्या 'जेलर' या चित्रपटाची लागली होती.
 
दरम्यान, रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटात दोन मराठी कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे आणि गिरीश कुलकर्णी या दोन मराठी कलाकारांनी यात मराठी चित्रपटसृष्टीचा डंका वाजवला आहे. गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत इंट्री घेतली आहे. तर मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांवर कौतूकाची वर्षाव होत आहे.
 
रजनीकांत यांचा 'जेलर' या चित्रपटातून तब्बल २ वर्षांनंतर रजनीकांत मोठ्या पडद्यावर परतले. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.‘जेलर’ या चित्रपटात रजनीकांत मुथुवेल पांडियन, एका सामान्य कुटुंबाभिमुख पुरुषाची भूमिका साकारत असल्याचे दाखवण्यात आले आहे. जेव्हा त्यांच्यावर संकट कोसळू लागते तेव्हा त्याचा सामना कसा करतात हे दाखवण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0