संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

11 Aug 2023 19:45:29
Lok Sabha adjourned sine die

नवी दिल्ली
: संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेच बनावट स्वाक्षरीप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज बेमुदत तहकूब केल्याची घोषणा केली. बिर्ला म्हणाले की २० जुलैपासून सुरू झालेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या १७ बैठका झाल्या. यादरम्यान सभागृहाचे कामकाज ४४ तास १५ मिनिटे चालले. या अधिवेशनात २० विधेयके मांडण्यात आली आणि २२ विधेयके मंजूर करण्यात आली. सभागृहात विचारलेल्या २० प्रश्नांची तोंडी उत्तरे ९ ऑगस्ट २०२३ रोजी देण्यात आली. १७ व्या लोकसभेचे हे १२ वे अधिवेशन होते. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजात सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व पक्षांचे नेते आणि खासदारांचे आभार मानले.

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना बनावट स्वाक्षरी प्रकरणी नियमांचे उल्लंघन, अवमानकारक वर्तनासाठी राज्यसभूत विशेषाधिकार समितीची अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आपचे खासदार संजय सिंह यांचेही निलंबन विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत वाढविण्यात आले आहे.









Powered By Sangraha 9.0