युपीआयसाठी जपान आणि इतर देश इच्छुक - आरबीआय

11 Aug 2023 12:44:27
UPI Lite
 
 
 
युपीआयसाठी जपान आणि इतर देश इच्छुक - आरबीआय
 

मुंबई:   नुकत्याच एमपीसीचा झालेल्या बैठकीनंतर आरबीआयने युपीआय लाईटची पेमेंट मर्यादा २०० रुपये वरून वाढवून ५०० रुपये केली आहे.त्याच धर्तीवर इतर अनेक देशात देवाणघेवाणेसाठी युपीआयचे लिंकेज उपलब्ध करण्याचा आरबीआयचे नियोजन आहे.फेब्रुवारी २३ मध्ये सिंगापूर देशाने युपीआय प्रणाली स्विकारून पेनाऊ या सिंगापूर पेमेंट प्रणालीशी संलग्न केली होती.आता हे युपीआय जपान व काही देश स्विकारण्यासाठी इच्छुक आहेत.
 
 
गुरूवारी पतधोरण जाहीर केल्यानंतर आरबीआय गर्व्हनर शशिकांता दास यांनी युपीआय साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग करणार असल्याचे सांगितले होते.नजिकच्या काळात निअर फील्ड कम्युनिकेशन्स ( एन एफ सी) चा वापर ऑफलाईन युपीआय पेमेंट लाईट साठी केला जाईल असे सांगण्यात आले आहे.
 
 
आरबीआयने नुकतेच युएई पेमेंट सिस्टीम संलग्न करण्यासाठी करार केल्याचे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर रबी शंकर यांनी सांगितले आहे.युपीआयची उपयुक्तता वाढविण्यासाठी आमचे अनेक प्रयत्न सुरू आहेत.विकसित देशांबरोबर देखील आमचे बोलणे सुरू असल्याचे रबी शंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
 
 
यामुळे येणाऱ्या काळात युपीआयची स्विकारार्यता वाढल्यास देशातील अनिवासी भारतीय आणि प्रवाश्यांना यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.आर्थिक देवाणघेवाण सक्षम झाल्यास त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0