'ISRO'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या आणि आजच अर्ज करा
11 Aug 2023 16:01:31
मुंबई : 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' अर्थात 'इस्त्रो'मध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ISRO Recruitment 2023 बद्दल माहिती जाणून घेऊयात.
इस्त्रो २०२३ भरती अंतर्गत फायरमन-ए आणि कुक या पदांसाठी पात्र आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक उमेदवार या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करु शकतात. तसेच, या संपूर्ण भरतीप्रक्रियेविषयीची माहिती अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर या पदांसाठी उमेदवारांची निवड इस्त्रोच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज ३१ जुलैपासून सुरु झाले असून तुम्ही १४ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. फायरमन-ए (०३ पदे), कुक (०१) पदासाठी अर्ज करण्यासाठी ओबीसी वर्गाकरिता कमाल वयोमर्यादा २८ वर्षे, तर एससीसाठी ३० वर्षे आणि इडब्ल्यूसाठी ३० वर्षे तर कुक या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. तर ISRO भर्ती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे, अर्जाची फी रु. ५०० असणार आहे.
तर निवडलेल्या उमेदवारांना रु. १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन दिले जाईल. उमेदवार एसएसएलसी/एसएससी पास असणे बंधनकारक आहे.