बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंदणी कशी झाली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

11 Aug 2023 15:57:52
Banke Bihari Ji Maharaj Temple land went to a Muslim graveyard

नवी दिल्ली
: बांके बिहारी महाराज मंदिराची जमीन कब्रस्तानच्या नावावर करण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने तहसीलदारांना जाब विचारला आहे. मथुरा जिल्ह्यातील छटा तहसीलच्या तहसीलदारांनाही प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

श्री बिहारी जी सेवा ट्रस्टने (मथुरा) याबाबत याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव म्हणाले की, मथुरा जिल्ह्यातील छटा तहसीलमधील शाहपूर गावात असलेल्या प्लॉट क्रमांक १०८१ ची स्थिती वेळोवेळी बदलण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वस्तुस्थिती व परिस्थिती लक्षात घेऊन महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण देण्यासाठी तहसीलदारांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

'श्री बिहारी जी सेवा ट्रस्ट (मथुरा)'ने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, मूळत: ही जमीन राज्याच्या महसूल रेकॉर्डमध्ये बांके बिहारी जी महाराज मंदिराच्या नावावर नोंदवण्यात आली होती. मात्र २००४ साली कब्रस्तानच्या नावावर नोंदणी करण्यात आली. मंदिराच्या जमिनीतील 'बेकायदेशीर' बदल दुरुस्त करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे.

पुरातन काळापासून ही जमीन बांकेबिहारी महाराज यांच्या नावावर नोंदवण्यात आली होती, असेही याचिकेत म्हटले आहे. मात्र भोला खान पठाण नावाच्या व्यक्तीने महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद करून घेतली. याची माहिती मिळताच मंदिर ट्रस्टने आक्षेप घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण वक्फ बोर्डाकडे गेले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय पथक तयार करण्यात आले होते. मंदिराच्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने स्मशानभूमीच्या नावावर नोंद झाल्याचे तपासात उघड झाले. मात्र, असे असतानाही या जमिनीची नोंद बांके बिहारीजी महाराज मंदिराच्या नावावर झाली नाही.

त्याचवेळी, या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने हजर झालेल्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात ही जमीन स्मशानभूमीच्या नावावर नोंदवण्यासाठी अर्जही प्रलंबित आहे, कारण आता या जमिनीची नोंद करण्यात आली आहे. कब्रस्तानच्यावरून 'पुरानी आबादी' असे बदलले आहे.



Powered By Sangraha 9.0