उत्तर प्रदेशमध्ये हनुमानाच्या मूर्तीची विटंबना; आरोपी आसिफ आणि आमिरला अटक

10 Aug 2023 12:36:38
Hanuman 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे तीन दारुड्यांनी देवाच्या मूर्तीची तोडफोड केली आहे. या प्रकरणी ५ ऑगस्ट २०२३ रोजी एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद आसिफ आणि आमिरला अटक केली आहे, तर त्याचा मित्र नासिर फरार आहे. दारूच्या नशेत हे काम केल्याचे आरोपींनी सांगितले.
 
 
 
हे प्रकरण ललितपूरच्या तालबेहाट शहरात असलेल्या महाराजा मर्दन सिंह यांच्या किल्ल्याशी संबंधित आहे. या किल्ल्यातील मंदिरातील हनुमानजींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. ही घटना ४ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
 
८ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांनी या प्रकरणात २ आरोपींना अटक केली होती. आसिफ आणि अमीर अशी त्यांची नावे आहेत. त्याचा आणखी एक साथीदार नसीर सध्या फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण दारुच्या नशेत होते. तलबेहतचे सीओ कुलदीप कुमार यांनी आरोपींच्या अटकेबाबत माध्यमांशी संवाद साधला.
 
त्यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट २०२३ रोजी मंदिराच्या चौकीदाराने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. आसिफ आणि आमिरला अटक करण्यात आली आहे, तर त्यांचा साथीदार नासिर फरार आहे. नासीरला पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0