अण्णाभाऊ साठे यांना राजकीय वर्तुळातून मानवंदना, अनेक नेत्यांनी वाहिली आदरांजली

01 Aug 2023 19:42:21

annabhau sathe
 
 
मुंबई : दलित साहित्याचे उद्गाते, लोकसंस्कृतीचे संवर्धक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. राजकीय नेतेही यात मागे नाहीत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच इतरांनीच श्रद्धांजली वाहिली आहे.
 
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नाशिक शहरातील एन.डी.पटेल रोडवरील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मंत्री छगन भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले. ते म्हणाले, "अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय कठिण परिस्थितीतून लढा देत कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. ही पृथ्वी श्रमिकांच्या श्रमावर उभी आहे असे त्यांचे विचार होते. श्रमिक, सर्वसामान्य नागरिकांचे दु:ख लोकशाहिरांनी आपल्या साहित्यातून मांडले." वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज अभिवादन केले.
 
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल यांनी ण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Powered By Sangraha 9.0