मेवातला हिंदूंचे कब्रस्तान बनू देणार नाही : विश्व हिंदू परिषद

01 Aug 2023 19:29:17
Islamists attack VHP’s shobha yatra in Mewat

नवी दिल्ली :
हरियाणातील मेवात येथे हिंदूंच्या धार्मिक शोभायात्रेवर हल्ला करण्यासाठी मौलवींनी मुस्लिमांना भडकविले आहे. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद (विहिंप) लढा देणार असून मेवातला हिंदूंचे कब्रस्तान बनू देणार नाही, असा इशारा विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी पत्रकारपरिषदेत दिला आहे.

विहिंपतर्फे हरियाणातील मेवात – नूह येथे ३१ जुलै रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेस आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात हिंदू भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र, या शोभायात्रेवर एकाएकी स्थानिक मुस्लिमांनी हल्ला केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.

शोभायात्रेवर दगडफेक झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. दगडफेकीनंतर काही वेळातच गोळीबार आणि जाळपोळीस प्रारंभ झाला. यावेळी दंगेखोरांनी तेथे असलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या जाळण्यास सुरुवात केली. या हिंसाचारामध्ये काही वेळातच या गोंधळाचे रूपांतर दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळीत झाले. या हिंसाचारात एक होमगार्ड जवान आहे तर पोलिस उपायुक्तांसह १० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे. याशिवाय २० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुरुग्राम, फरीदाबाद आणि पलवल येथून अतिरिक्त पोलिसदल मागविण्यात आले. पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या असून नूह जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. याविषय़ी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी पत्रकारपरिषदेत हा प्रकार म्हणजे मुस्लिम मौलवींचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराचे दर्शन गेण्यासाठी मेवात येथील महाभारतकालीन पाच मंदिरांमध्ये भाविक एकत्र येतात. यावर्षी सुमारे २० ते २५ हजार भाविक एकत्र आले होते. भाविकांच्या शोभायात्रेस सुरूवात होताच हल्लेखोरांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ सुरू केली. हा प्रकार मौलवींनी मुस्लिमांना भडकविल्यामुळे झाला विहिंप असून मेवातला हिंदूंचे कब्रस्तानल बनू देणार नाही. त्यासाठी मेवात आणि आसपासच्या भागांमध्ये देशभरात निदर्शने करण्यात येणार असल्याचेही डॉ. जैन यांनी सांगितले आहे.


Powered By Sangraha 9.0