जुलै महिन्यात १ लाख ६५ हजार १०५ कोटी रूपये जीएसटी महसूल

01 Aug 2023 19:56:11
GST revenue collected in the month of July stood at Rs 1 Lakh crore

नवी दिल्ली :
देशात जुलै २०२३ मध्ये संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर महसूल १,६५,१०५ कोटी रुपये असून त्यापैकी २९,७७३ कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, ३७,६२३ कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर, तर ८५,९३० कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या ४१,२३९ कोटी रुपयांसह) आणि ११,७७९ कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या ८४० कोटी रुपयांसह) रुपात संकलित करण्यात आले आहेत.

सरकारने, एकात्मिक वस्तू आणि सेवा करापैकी ३९,७८५ कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच ३३,१८८ कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात मंजूर केले आहेत. नियमित मंजूरीनंतर, जुलै २०२३ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी साठी ६९,५५८ कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच ७०,८११ कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर इतका आहे.

देशातील जुलै २०२३ चा महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलाच्या तुलनेत ११% ने अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुला च्या तुलनेत १५% ने अधिक आहे. सकल वस्तू आणि सेवा कर संकलन पाचव्यांदा १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्याने वाढ झाली असून जुलै २०२३ मध्ये २६०६४ कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. महाराष्ट्रात जुलै २०२२ मध्ये २२,१२९ कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला होता. महाराष्ट्रात, जुलै २०२३ महिन्यात ७,९५८ कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले तर ४१६७ कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण १२,१२४ कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे.





Powered By Sangraha 9.0