बीड : केज तालुक्यातील उमरी शिवारात कलाकेंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी ठाकरे गटाते जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आले आहे. त्याचे प्रसिद्धी पत्रक खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केले आहे.दरम्यान यातील आरोपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना काही दिवसांपुर्वीच शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
केज तालुक्यातील उमरी शिवारातील कलाकेंद्रावर दि. ७ जुलै रोजी मध्यरात्री पोलीसांनी छापा मारला. त्यावेळी चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली,महिला नृत्य करताना पोलीसांना आढळल्या. तरी यातील एका मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. तसेच या अल्पवयीन मुलीने तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी देखील भाग पाडल्याचा आरोप केला. या कारवाईत ४ अल्पवयीन मुलींसह २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच १६ पुरूषांना ही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हे कलाकेंद्र चालवणाऱ्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे.