मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का लागला असून मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुरडे यांनी मनसेला रामराम ठोकला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात घडामोडी घडत असताना आता मनसेला मुंबईत खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे कलिना प्रभाग क्र. १६६ चे नगरसेवक संजय तुरडे यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, मागील बृहन्मुंबई महानगरपालिकेत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर एकमेव नगरसेवक संजय तुरडे मनसेशी एकनिष्ठ राहिले होते. दरम्यान, आता त्यांनी पक्षाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला.