मुंबई : महाराष्ट्र शासनाची विद्युत उपयोगिता कंपनी महापारेषण या वीजनिर्मिती कंपनीत लवकरच विविध पदांकरिता नोकरभरती करण्यात येणार असून या कंपनीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. शासनाच्या महापारेषण कंपनीमध्ये विविध पदांच्या तब्बल ३१२९ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
या पदांकरिता होणार महापारेषणमध्ये नोकरभरती
कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ – ॥ (पारेषण प्रणाली), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), अनुसूचित जमातीकरिता विशेष भरती मोहिम, टंकलेखक (मराठी).