अमरावती : राज्यातील अनेक घडामोडीनंतर पक्षसंघटनेसाठी उद्धव ठाकरे महराष्ट्र दौरा करणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. यासाठी 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्यापूर्वीच 'उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे बॅनर लावले आहेत. ज्यावर हिंदूस्तानचे भाग्यविधाते, भावी पंतप्रधान असा उल्लेख आहे. या बॅनरवर ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांचा फोटो लावण्यात आला आहे. 'आता महाराष्ट्रच नाही तर दिल्ली ही काबीज करु.' असे ही बॅनरवर लिहिण्यात आले आहे.